Wednesday, February 14, 2018

वार

१.
का असे अव्हेरले तीर नजरेचे
जगण्यास प्रेम तुझे ग गरजेचे..!
जाणतो तुझे मन अधीर भेटीला
ग नको करू असे वार नजरेचे..!
..... प्रल्हाद दुधाळ.
२.
नको करु असे वार नजरेचे
आधीच मी रे आहे घायाळ अशी..!
आस्तीत्व ते आजूबाजूला असता
अंगभर दरवळते ही खुशी..!
 ..... प्रल्हाद दुधाळ.
३.
नको करू असे वार नजरेचे
अवहेलनेची टोके बोचतात..!
उठता बसता उगाचच मग
उदासवाण्या कविता सुचतात..!
..... प्रल्हाद दुधाळ.
४.
नको करू असे वार नजरेचे
आज तर आहे डे वैलंटाईन..!
हात घे माझा विश्वासाने हातात
 जीवन होईल सुपरफाईन..!
   .... प्रल्हाद दुधाळ.
५.
नको करु असे वार नजरेचे
तोडून टाकू जुळलेली ही प्रीत..!
विरहातही मग गाशील ना ग
तुझ्यावर मी रचलेले ते गीत..!
...... प्रल्हाद दुधाळ.
६.
प्रेम दिवसाच्या पवित्र दिवशी
नको करू असे वार नजरेचे...!
नियतीने जुळवलेले हे नाते
निभावणे आहे ग ते गरजेचे...!
 ..... प्रल्हाद दुधाळ.
७.
नको करू असे वार नजरेचे
चुकायची माझी ती जुनीच खोड..!
सांभाळून घेतलं जर वेड्याला
संसार नक्कीच होईल हा गोड..!
.... प्रल्हाद दुधाळ.

No comments:

Post a Comment