Saturday, September 6, 2014

हिशोब.

हिशोब.
आयुष्यभर जे कमावले
वारसाला मालामाल केले  
तिरडीवरचे कापड सुद्धा
मोजूनच त्याने आणले!
    .....प्रल्हाद दुधाळ.


Wednesday, August 6, 2014

प्रकोप.

निसर्ग चक्राशी  खेळणे
आतातरी थांबायला हवे,
प्रकोप झालां निसर्गाचा
त्यावरून शिकायला हवे .
            प्रल्हाद दुधाळ.

Sunday, July 20, 2014

माफी.

चुकलं चुकुन काही,लगेच मागावी माफी.

चुकलं कुणाचं काही,करून टाकावं माफ.

बोलुन टाकावं काही,खुपलेलं मना मनात.

किल्मिष नकोच काही,आनंदी नातेसंबंधात,

...***प्रल्हाद दुधाळ***...

Thursday, July 17, 2014

रान .

आता रुजेल बियाणे,
इवला तरारेल अंकुर.
वारा हलवेल झुला,
रान नटेल हिरवेगार!

    ....प्रल्हाद दुधाळ.

Monday, June 16, 2014

साभार.



जे दिले नियतीने
साभार घेतले मी
उज्वल उद्या साठी
साकडे घातले मी.
........ प्रल्हाद दुधाळ.

श्रीमंती.

धन दौलत बंगला गाडी 
व्यर्थ जर नाही तेथे नीती,
माणुसकी धर्म हवा अन 
दिलदार मनाची श्रीमंती.
....प्रल्हाद दुधाळ.

जाणीव.

जाग्रूत जाणीवेने 
धरेवरी पाय होता 
अन्यथा जीवना या 
आधार काय होता ?
.....प्रल्हाद दुधाळ

Tuesday, June 10, 2014

माफी.

माफी मागून,माफ करून,
नाही बदलत भूतकाळ,
एवढ मात्र नक्कीच होत,
प्रसन्न होतो भविष्यकाळ!

      ......... प्रल्हाद दुधाळ  

पाप.

धुंडाळले आश्रम सारे
केले किती जपताप
केली किती तीर्थाटने
धुतले जाईना ते पाप.
      .......प्रल्हाद दुधाळ. 

हेतू.

आयुष्यभर  केलेस,
हेवेदावे आणि मी तू,
मनास विचार एकदा,
काय जगण्याचा हेतू?
            .....प्रल्हाद दुधाळ  

Saturday, June 7, 2014

अधांतरी

काडी काडी जमऊन
माझे घरटे  बांधले
आयुष्याचे संचित
अधांतरी हे टांगले.
            प्रल्हाद दुधाळ.

Monday, June 2, 2014

खजिना

तुझी साथ मिळाली
आधारास हात मिळाला
आयुष्यात आनंदाचा
खजिना हातोहात मिळाला.
      ........प्रल्हाद दुधाळ 

तगमग

वाटेत जे भेटले जीवनी  
सगळेच कुठे  माझे होते?
वाटसरूंना जिवलग काही
आठवताच तगमग होते!
            प्रल्हाद दुधाळ.

आठवणी

क्षण वेचले तुझ्यासवे,
होते का ग ते स्वप्न?
चाळविती आठवणी,
ठिकाणी ठिकाणी !
            प्रल्हाद दुधाळ .

चंद्रकोर.

पुन्हा पुन्हा खुणावत होता,
कोजागिरीचा तो चंद्र  तिला ,
चिंता होती सतावत त्याला,
सांजेच्या एका चतकोरीची!
                    प्रल्हाद दुधाळ .

दिशा

 विचारांची दिशा
 बदल रे  थोडी
 वाढेल निश्चित
आयुष्याची गोडी!
            प्रल्हाद दुधाळ.

कुचकामी

सख्यास्तव उसंत  नाही
कर्तव्य असे कुचकामी
एकटी वाट जीवनाची
आयुष्य असे कुचकामी!
   ........प्रल्हाद दुधाळ.

Tuesday, May 27, 2014

प्रवास.

जो काही प्रवास झाला ,
मज वाटते खास झाला .
खडबडीत जरी तो रस्ता ,
हमरस्त्याचा भास झाला.
             .....
प्रल्हाद दुधाळ.

नगारा.

शिवजयंती,महाराष्ट्र दिनाला, 
मराठीचा नगारा वाजतो, 
एरवीला मराठी माणूस, 
घरातही इंग्रजीच बोलतो!

                ........प्रल्हाद दुधाळ.

भ्रम.

कधी कुणाला फसवत गेलो,
 नाती एक एक उसवत गेलो,
भ्रमात राहिलो असा कसा मी,
जाळ्यात माझ्याच फसत गेलो !

                  ........प्रल्हाद दुधाळ.

देखावे

खुशीचे देखावे
पाहुन ते घ्यावे
 मुखवट्याआड
सुकली आसवे!

          ........प्रल्हाद दुधाळ.

सोड रुसवा.

नको आता बहाणे
नेहमीचे गाऱ्हाणे
सखे सोड रुसवा 
होऊ पुन्हा शहाणे!
     ........प्रल्हाद दुधाळ.

अभ्यास.

आनंदात जगणे -एक अभ्यास, 
संकटे ही परीक्षा छोटी-मोठी, 
अभ्यासक्रम हा आयुष्यभराचा, 
इथे कधीच नसते कसली सुट्टी!
.........
प्रल्हाद दुधाळ,पुणे.

जुगार.

 कर्तुत्व ते नाहीच काही,
 येइनात कामाला नाती,
 सत्तेच्या जुगारात मग,
 वेठीला धर्म आणि जाती!

       ...... प्रल्हाद दुधाळ,पुणे.  

कारभारी,

सच्चे, शिक्षित व संस्कारी,
निवडून असे देऊ कारभारी,
भ्रष्ट, कोडगे हाकलुन द्यावे,
येईल समृद्धी देशाच्या दारी!

       प्रल्हाद दुधाळ,पुणे.  

झुंज

बोक्यांमधली ही झुंज रंगली,
खाण्यासाठी सत्तेचे लोणी.
विसरतील ती मिळता खुर्ची,
जनतेच्या डोळ्यात पुन्हा पाणी!

        ...........प्रल्हाद दुधाळ.

लाडीगोडी.

साखरपेरणी आज लाडीगोडी ,
मतासाठी घातलीसे पायघडी !
मिळता सत्तेचे हवेसे ते दान ,
ठोकरुन पुसतील, तुम्ही कोण ?
...............प्रल्हाद दुधाळ.

बाद ,

कारणाने इवल्या वादविवाद ,
विवेक बुध्दीला करतात बाद ,
नात्यामधे येऊ शकतो दुरावा,
कशास मग बर्बादी ला पुरावा?
..........................प्रल्हाद दुधाळ.

उरले कुठे?

पाठीवरती घ्यावी थाप
हात असे आता उरले कुठे?
लोटांगण घ्यावे तयाशी
पाय असे आता उरले कुठे?

..........................प्रल्हाद दुधाळ.

कमाल.

जीवघेणी चाल
नजर कमाल
आवर नखरा
गर्दी बेहाल.
..........................प्रल्हाद दुधाळ.


करणी.

करणीच तशी
तडफडला जीव
मोहाने तुझ्या  
पाडले फशी.

..........................प्रल्हाद दुधाळ.

साथ

कशास पर्वा
तुझी माझी साथ
एवढ मात्र कर
नको करू घात.
..........................प्रल्हाद दुधाळ.


लाथा.

सहनशीलता
कसोटी क्षणोक्षणी
पदोपदी मिळती
बुक्क्या नी लाथा.

..........................प्रल्हाद दुधाळ.

पारा.

रागाचा पारा
विवेक गहाण
निसरडी जीभ
शब्द बोचरा.
..........................प्रल्हाद दुधाळ.


तुझ्याविना.

भरलेला प्याला
संगे मंद धून
तुझ्याविना
हृदयात ज्वाला.
..........................प्रल्हाद दुधाळ.


उल्कापात

कोजागिरीची रात
चमचमत्या तारका
झाला एक उल्कापात  
सुटला हातातून हात.
..........................प्रल्हाद दुधाळ.