Friday, March 27, 2015

गवसणी

शिकविलेस स्वाभिमानी जगणे,
माणुसकीने जिंकण्याचा ध्यास...
संकटातही आई शोधेन संधी,
घालेन गवसणी मी गगनास..!!


प्रीती तुझी ही संजीवनी मजला,
अर्थ नव्याने आला या जगण्यास....
साथीने या जीवन मंगल गाणे,
घालेन गवसणी मी गगनास..!!

मांडला डाव वारंवार मोडला
हिरावला आलेला तोंडाशी घास...
लढाई जगण्याची पुन्हा नव्याने
घालेन गवसणी मी गगनास..!!

माणसांना अनुभवले इतके,
समृद्ध समर्थ केले जीवनास....
साथीत जगतो समरसतेने,
घालेन गवसणी मी गगनास..!!

     ......प्रल्हाद दुधाळ.


Sunday, March 22, 2015

वेदना 3

अनुभवले भोगले जे समोर वाढले 
आठवता कधी जीवनास या कंटाळतोII 
हार मी न मानली जगतो नव्याने परी,

वेदनेचा एक गाव मी ह्रदयी पाळतोII
......प्रल्हाद दुधाळ.

वेदना .

राहीली ना माणुसकी संवेदना संपली,
स्वार्थी तो प्रतिष्ठीत दयाबुध्दी हरपली,
नीती अनिती लाज लोभात ती हरवली,

वेदनेचा एक गाव मी ह्रदयी पाळतो!
....प्रल्हाद दुधाळ.

Friday, March 20, 2015

वेदना २ .

आपल्याच माणसांनी वार ते केले असे
गुंततो पुन्हा सवयीने पुन्हा सांभाळतोII
सहन होईना असे घाव दिले नात्यांनी
वेदनेचा एक गाव मी हृदयी पाळतो।।

               .....प्रल्हाद दुधाळ.

Thursday, March 19, 2015

घाव

थांबविले आहे आता भावनांत गुंतणे,  
शब्दांचे ते घाव घेणे मी प्रयत्ने टाळतो।i
रोजची नशिबी अवहेलना हेटाळणी,
वेदनेचा एक गाव मी हृदयी पाळतो।।

              ......प्रल्हाद दुधाळ.

Tuesday, March 17, 2015

होड्या

माणसाचे हे आयुष्य,
कागदाच्या होड्या जशा...
भरकटते जीवन, 
वारा ठरवितो दिशा.... 
.....प्रल्हाद दुधाळ.

Sunday, March 15, 2015

होड्या.

**************************
त्या पावसातल्या निरागस खोड्या,
पाण्यात सोडल्या रंगारंग होड्या.....
वास्तवात त्या कधीही  ना जुळल्या,
भातुकलीच्या खेळामधल्या जोड्या....
*****************प्रल्हाद दुधाळ.

Thursday, March 12, 2015

सये.

तोच मी, तोच तो नदीचा  किनारा,
दाटते  हुरहुर पुन्हा  ती सखे ....
गीत स्मरते ,भासते आसपास,
अन् पुन्हा त्या सांजवेळी तू सये.....
             .........प्रल्हाद दुधाळ.

Sunday, March 8, 2015

बहाणे.

फुलांत फुल हे रमले भासते ,
कवितेत त्याच्या हरवून जाते,
सत्य असे का लपवून लपते?
शृंगारुन त्याची ती वाट पहाते!
    .........  प्रल्हाद दुधाळ.

Thursday, March 5, 2015

होळी.

घडले जे काही गैरसमजातून
आज विसरून सगळे ते जावू !
सण होळीचा हा करू साजरा
चला रंगात सारे रंगून जावू !!
     ..............प्रल्हाद दुधाळ .

Tuesday, March 3, 2015

पाऊस

हवा जेंव्हा गायब 
नको तेंव्हा हजेरी 
असा अती लहरी 
पाऊस हा !
...प्रल्हाद दुधा

उत्साह

चाहूल लागता रविकिरणांची,

 नगरात असा उत्साह दाटला...

पोटापुरता पसा मिळविण्या,

 जीव येथला कामास लागला....


...........प्रल्हाद दुधाळ.