Thursday, November 14, 2019

पहाट

पहाट...
 आजच्या पहाटेचा
 आहे अंदाज न्यारा
 आठवण तुझी अन
 बोचरा थंड वारा
    ... प्रल्हाद दुधाळ.

Monday, July 29, 2019

घन ओथंबून आले

घन ओथंबून आले
चिंतातूर मन झाले
कुठे घ्यावा रे आसरा
नयनात पाणी आले

घन ओथंबून आले
आता येईल ती सर
अशा रम्य या सांजेला
प्रेम भावनेला बहर

घन ओथंबून आले
येईल तो मृदगंध
अशी झाले उतावीळ
घेण्या भरून सुगंध

घन ओथंबून आले
विचाराने मन चिंब
गोंधळले किती सांगू
ओशाळले प्रतिबिंब

घन ओथंबून आले
मनी दाटे हूरहूर
असशील कुठे आता
मी इथे तू तिथे दूर
....प्रल्हाद दुधाळ.


Sunday, July 28, 2019

घरटे


हितगुज

हितगुज...
 तुझ्या नयनात सखे
आपुले भविष्य दिसते
तुझ्या माझ्या संगतीने
अवघे आयुष्य हासते
नयनांचे ते नयनाशी
चालते मस्त हितगुज
सहजीवनाची त्या ओढ
आता लागलीसे मज
....प्रल्हाद दुधाळ.