Sunday, July 26, 2015

विठ्ठल नाम .

रूप ते सावळे
सानंदे पाहती
तालात नाचती
नाम ओठी.
दर्शन ते होता
रोमांचित तन
होते लीन मन
पायी त्याच्या.
साजरे ते रूप
घालू लोटांगण
झाले तन मन
भक्ती रूप.
धन्य झाले जिणे
होता ते दर्शन
मोक्षाचा तो क्षण
पांडूरंगा.
आता नको काही
लोभ हा असावा
शांतीचा विसावा
पायी तुझ्या.