Tuesday, August 28, 2018

भारत महान


१.
त्यांचा इंडिया झगमगाटात  
सारे कसे अगदी छान छान..!
अन्नवस्रादिस आम्ही महाग
लिहितो मेरा भारत महान..!
    .... प्रल्हाद दुधाळ.
२.
निंदा कुणी किती वंदा परंतु
नसानसात आमच्या देशाभिमान..!
करून समस्यांवर मात शिकते आहे   
प्रिय देश माझा हा भारत महान..!     
         .... प्रल्हाद दुधाळ.

Monday, March 12, 2018

कवडसा

कधी हरवतो घोर नैराश्यात
जीवनाचा हरवतो भरवसा!
कुठून अचानक येते तिरिप
उमेद देवून जातो कवडसा!
__ प्रल्हाद दुधाळ

Thursday, March 1, 2018

फेब्रुवारी

फेब्रुवारी 
अठ्ठावीस दिवसांचा फेब्रुवारी 
संपताना उगा निराशा दाटते!
दोन दिवसांनीअमुल्यआयुष्य 
असेच घटल्यासारखे वाटते!
___ प्रल्हाद दुधाळ

Thursday, February 15, 2018

वाट तुझी पाहताना

१.
वाट तुझी पाहताना
डोळे शिणून जातात
लोक आजूबाजूचे
मला पुतळा समजतात
..... प्रल्हाद दुधाळ.
२.वाट तुझी पाहताना
भर्रकन वेळ जातो
तुझ्या प्रेमाखातर
कधी उपाशी रहातो
 ..... प्रल्हाद दुधाळ.
३.
वाट तुझी पाहताना
हरपते माझे ग भान
तु समोर दिसेपर्यंत
अवघडते माझी मान
..... प्रल्हाद दुधाळ.
४.
वाट तुझी पाहताना
माझी मी नाही उरत
समोर आलास की
काय बोलू नाही ठरत
.... प्रल्हाद दुधाळ.
५.
वाट तुझी पाहताना
तशी मला येते मजा
भेट नाही झाली तर
द्यावी वाटे तुला सजा
..... प्रल्हाद दुधाळ.
६.
वाट तुझी पाहताना
 लागली माझी वाट
आईने बदडून काढले
सोलाटली सारी पाठ
  .... प्रल्हाद दुधाळ.
७.
वाट तुझी पाहताना
सरलं अर्ध हे वय
आता भेट होईल का
वाटे अनाठायी भय
... प्रल्हाद दुधाळ.
८.
वाट तुझी पाहताना
रस्त्यावर घेतो डुलकी
वेडा समजून वाहनस्वार
शिवी घालती मला शेलकी
..... प्रल्हाद दुधाळ.
९.
वाट तुझी पाहताना
मध्य रात्र की झाली
आता तू गेला उडत
मला खूप झोप आली
...... प्रल्हाद दुधाळ.







Wednesday, February 14, 2018

वार

१.
का असे अव्हेरले तीर नजरेचे
जगण्यास प्रेम तुझे ग गरजेचे..!
जाणतो तुझे मन अधीर भेटीला
ग नको करू असे वार नजरेचे..!
..... प्रल्हाद दुधाळ.
२.
नको करु असे वार नजरेचे
आधीच मी रे आहे घायाळ अशी..!
आस्तीत्व ते आजूबाजूला असता
अंगभर दरवळते ही खुशी..!
 ..... प्रल्हाद दुधाळ.
३.
नको करू असे वार नजरेचे
अवहेलनेची टोके बोचतात..!
उठता बसता उगाचच मग
उदासवाण्या कविता सुचतात..!
..... प्रल्हाद दुधाळ.
४.
नको करू असे वार नजरेचे
आज तर आहे डे वैलंटाईन..!
हात घे माझा विश्वासाने हातात
 जीवन होईल सुपरफाईन..!
   .... प्रल्हाद दुधाळ.
५.
नको करु असे वार नजरेचे
तोडून टाकू जुळलेली ही प्रीत..!
विरहातही मग गाशील ना ग
तुझ्यावर मी रचलेले ते गीत..!
...... प्रल्हाद दुधाळ.
६.
प्रेम दिवसाच्या पवित्र दिवशी
नको करू असे वार नजरेचे...!
नियतीने जुळवलेले हे नाते
निभावणे आहे ग ते गरजेचे...!
 ..... प्रल्हाद दुधाळ.
७.
नको करू असे वार नजरेचे
चुकायची माझी ती जुनीच खोड..!
सांभाळून घेतलं जर वेड्याला
संसार नक्कीच होईल हा गोड..!
.... प्रल्हाद दुधाळ.

Thursday, January 4, 2018

कवडसा..

कवडसा..
स्वातंत्र्याचा येथे तो सूर्य तळपता,
वाटले जाईल दीनांघरी कवडसा..!
बळी तो कान पिळतोय पण आता,
गरीबांना मिळेना पोटापुरता पसा..!          
 ....प्रल्हाद दुधाळ.