Saturday, February 4, 2017

सूर्यदेव

उगवत्या सूर्यदेवा
नमस्कार माझा तुला..!
आस्तीत्वाने तुझ्या
अंधकार तो पळाला..!


ग्रह तारे एका जागी   
भासे त्याचे येणे जाणे..!
साऱ्या सृष्टीला पोसती
रवी शशीची किरणे..!

 ....प्रल्हाद दुधाळ.

Thursday, February 2, 2017

नाते

मंगल मुहूर्तावरी चालते
हाती हात घेवून सप्तपदी..!
सुसंवादाने आणि सौहार्दाने
पार करू डोंगर नाले नदी..!
     .... प्रल्हाद दुधाळ.

भारतीय संस्कृती आपली
मोलाचा आहे लग्नसंस्कार...!
तडजोडीने फुलवू नाते
होईल सुखाचा ग संसार ...!
       .... प्रल्हाद दुधाळ.

Wednesday, February 1, 2017

प्रगती

प्रगती 
डिजीटल त्यांच्या इंडियात
भारताची पाटी आहे कोरी..!
अजूनही आम्हा लागे खावी 

कचराकुंडीतली भाकरी..!

तिथे पलिकडे महाली
पक्वानेही ती जाती वाया ..!
इथे चिमुकल्या पोटाला 

लागे शिळेपाके चावाया..!
..... प्रल्हाद दुधाळ.