Thursday, December 10, 2015

तुजविण..

तुजविण...
उभी मी अजुनही त्याच ठिकाणी
आठवणी जपलेल्या घेउन जा....!
तुजविण जगणे झाले विराणी
माझ्या भेटीस एकदा येऊन जा...!

           ...प्रल्हाद दुधाळ.

Tuesday, December 1, 2015

स्फोट.

स्फोट.
जेंव्हा सहनशक्तीचाही
होत असतो कडेलोट...
भावनांचा होतो उद्रेक
क्रोधाचा होई महास्फोट...
            .....प्रल्हाद दुधाळ.

Sunday, November 29, 2015

ध्यास.

ध्यास.
रात्रंदिवस आजकाल
लागलासे तुझाच ध्यास...!
जगणे झाले अवघड
घस्याखाली जाईना घास...!
  ...प्रल्हाद दुधाळ.

Thursday, November 26, 2015

का?


का?
अतूट ते होते नाते आपले
काय अपराध माझा घडला?
जन्मोजन्मीची गाठ ती सुटली   
विसर असा का माझा पडला?

           .....प्रल्हाद दुधाळ 

Tuesday, November 17, 2015

आठवण.

क्षण हे सजलेले या धुंद रात्री
हुरहुर मनी तुझी सय आली...!
नकळत आले डोळ्यामधे पाणी
आज पुन्हा तुझी आठवण आली...!
      ....प्रल्हाद दुधाळ.पुणे.

Friday, October 23, 2015

आस.

....आस ....
 हाकेस प्रेमाच्या त्या प्रतिसाद लाभता
जीवनी माझ्या नवी पहाट उजळली...!
 दर्शनाची  तुझ्या ग आता आस लागली
तुझ्या वाटेवर प्रितफुले उधळली....!
       .....प्रल्हाद दुधाळ.

Friday, October 16, 2015

वास्तव .

वास्तव .
काम क्रोध मद मत्सर वैरी 
घ्यावे समजून या वास्तवाला...!
क्षणभंगूर हे जीवन आहे 
शांत कर अहंकारी मनाला...!
....प्रल्हाद दुधाळ.

Sunday, October 11, 2015

.....या वळणावर........

......या वळणावर........
आयुष्याच्या या वळणावर
कमावले किती कुचकामी...!
प्रत्येक क्षण मनी आनंद
शांत मन वृत्ती समाधानी ...!
.......प्रल्हाद दुधाळ.

Monday, September 28, 2015

प्रार्थना

..........प्रार्थना ..........

नीती अनिती नुरले आता भान 

माणूस लागे पशूपरी जगाया...!
ढळलासे तोल या वसुंधरेचा 
आता तरी सद्बूध्दी दे गणराया...!
.....प्रल्हाद दुधाळ.

Tuesday, September 8, 2015

वृध्द.

.............वृध्द ..............
अहोरात्र ते झटले तुजसाठी
जपले तळहाताचे फोड जसे...!
थकले वार्धक्याने दुर्बल झाले  
नकोच अंतर देवु आता असे...!
        प्रल्हाद दुधाळ.

Friday, September 4, 2015

डाव.

***********डाव***********
आयुष्य माणसाचे खेळ तो घडीचा
आनंदी उत्साही संस्मरणीय करू...!
सुसंवादाने दुव्यांना कच्च्या सुधारू  
पुन्हा डाव मांडू चल नव्याने हरु...!

      .....प्रल्हाद दुधाळ.

Tuesday, September 1, 2015

धुंदी

...........धुंदी..............
बाहूमध्ये अशी विसावता
वास्तवाचे भान न उरते...
सहवासाची नशा आगळी
स्पर्शासाठी सदैव झुरते...

    ....प्रल्हाद दुधाळ.

Thursday, August 27, 2015

रक्षाबंधन.

..........**@**...........
रक्षाबंधन असे स्नेहबंधन
भावा बहिणीच्या या नात्यामधले...!
व्यवहारी आधुनिक जगानेही
पवित्र नात्यांचे उत्सव जपले ...!
       .....प्रल्हाद दुधाळ.

Monday, August 17, 2015

ओढ

..... ओढ.....
प्रीतीचे ते मंदीर दिसता
सौंदर्याने हरखून गेली...
नेई सख्याला हात खेचूनी
ओढ भेटीची अशी लागली...

      ....... प्रल्हाद दुधाळ. 

Friday, August 14, 2015

श्रीमंती.

......श्रीमंती......
बालपण ते श्रीमंत असते
निरागसतेला असतो भाव...
मालक असतो त्याच्या मर्जीचा
हक्काचा किनारा रंगीत नाव...

     ....प्रल्हाद दुधाळ. 

Wednesday, August 12, 2015

मस्ती

.......मस्ती........
हृदयाशी मला तू घेरे
धुंद कुंद ही अशी हवा...!
मस्तीत नाचून गायचे
सहवास हा तुझा हवा...!
     ......प्रल्हाद दुधाळ.



.....सोहळा......

  .....सोहळा......
 फुलला सदाबहरला संसारमळा
 सुखदुःखात देऊन अखंड संगत!
 जगणे झाले अपूर्व आनंद सोहळा
 चटणी भाकरीतही अनोखी रंगत!!
        .......प्रल्हाद दुधाळ.


........गोकूळ........

........गोकूळ........
मुलाबाळांच गोकूळ येईल खेळून
झाली दिवाबत्ती आता करते भाकर!
धनी येता शेतातून हसेल हे घर
आत्त्याबाई घ्यावा विंसावा घटकाभर!
       .......प्रल्हाद दुधाळ.
  

Monday, August 10, 2015

जीवनगीत

........जीवनगीत.......
उनाड वारा बहरली ही प्रीत
कसली लज्जा आणि कसली रीत.....!
ये एकमेकात विरघळून जाऊ
संगतीत गाऊ जीवनाचे गीत.....!  
     ......प्रल्हाद दुधाळ.


Friday, August 7, 2015

.........समंजस.......

.........समंजस........
वास्तव वेगळे आणि स्वप्न वेगळे,
केलेला समंजस तो स्वीकार होता!
जीवनास मम योग्य दिशा मिळाली,
किती लाघवी तुझा तो नकार होता!

           .........प्रल्हाद दुधाळ.

साद

........साद.......
मिलनाची घडी समीप ती
वाट पाहुनी हे डोळे शिणले....
श्रुंगार करूनी उभी दारी
तुजसाठी आर्त गीत गाईले...

        ...प्रल्हाद दुधाळ.

आतुर

......आतुर ....
सहजीवन ते असेल कैसे
वाट सख्या रे तुझी मी पाहते...
नटले सजले लज्जेत भिजले
नव वधू प्रिया रे बावरते...

        .....प्रल्हाद दुधाळ. 

Tuesday, August 4, 2015

स्वागत

.......स्वागत .....
रविकिरणांचे होई आगमन 
स्वागतास्तव मी त्याच्या सजले ग...

किरणांचा तर केवळ बहाणा 
सख्याच्या भेटीचे वेध लागले ग ....
.....प्रल्हाद दुधाळ

.संस्कार

......संस्कार .....
नटून थटून उभी द्वारी 
थाळी हाती ही पुजेची...
संस्कारांची होते जपणूक 
शिदोरी ही आपल्या परंपरेची...
.....प्रल्हाद दुधाळ.

.संस्कार वाणी

.......संस्कार वाणी......
दुर्लभ जरी टिकून आहे
आज्जीबाईची संस्कारवाणी!
कथा रंजक पुराणातल्या  
उद्बोधक परंपरा गाणी!!

      ......प्रल्हाद दुधाळ.

Sunday, July 26, 2015

विठ्ठल नाम .

रूप ते सावळे
सानंदे पाहती
तालात नाचती
नाम ओठी.
दर्शन ते होता
रोमांचित तन
होते लीन मन
पायी त्याच्या.
साजरे ते रूप
घालू लोटांगण
झाले तन मन
भक्ती रूप.
धन्य झाले जिणे
होता ते दर्शन
मोक्षाचा तो क्षण
पांडूरंगा.
आता नको काही
लोभ हा असावा
शांतीचा विसावा
पायी तुझ्या.

Friday, April 17, 2015

कोप.

ग्लोबल वार्मिंग आणि प्रदूषण,
आकांक्षा मानवाच्या करपल्या...
निसर्ग कोपला ऋतू बदलले,  
नभ थेंबातुन झळा बरसल्या.... 

            .....प्रल्हाद दुधाळ.

Friday, March 27, 2015

गवसणी

शिकविलेस स्वाभिमानी जगणे,
माणुसकीने जिंकण्याचा ध्यास...
संकटातही आई शोधेन संधी,
घालेन गवसणी मी गगनास..!!


प्रीती तुझी ही संजीवनी मजला,
अर्थ नव्याने आला या जगण्यास....
साथीने या जीवन मंगल गाणे,
घालेन गवसणी मी गगनास..!!

मांडला डाव वारंवार मोडला
हिरावला आलेला तोंडाशी घास...
लढाई जगण्याची पुन्हा नव्याने
घालेन गवसणी मी गगनास..!!

माणसांना अनुभवले इतके,
समृद्ध समर्थ केले जीवनास....
साथीत जगतो समरसतेने,
घालेन गवसणी मी गगनास..!!

     ......प्रल्हाद दुधाळ.


Sunday, March 22, 2015

वेदना 3

अनुभवले भोगले जे समोर वाढले 
आठवता कधी जीवनास या कंटाळतोII 
हार मी न मानली जगतो नव्याने परी,

वेदनेचा एक गाव मी ह्रदयी पाळतोII
......प्रल्हाद दुधाळ.

वेदना .

राहीली ना माणुसकी संवेदना संपली,
स्वार्थी तो प्रतिष्ठीत दयाबुध्दी हरपली,
नीती अनिती लाज लोभात ती हरवली,

वेदनेचा एक गाव मी ह्रदयी पाळतो!
....प्रल्हाद दुधाळ.

Friday, March 20, 2015

वेदना २ .

आपल्याच माणसांनी वार ते केले असे
गुंततो पुन्हा सवयीने पुन्हा सांभाळतोII
सहन होईना असे घाव दिले नात्यांनी
वेदनेचा एक गाव मी हृदयी पाळतो।।

               .....प्रल्हाद दुधाळ.

Thursday, March 19, 2015

घाव

थांबविले आहे आता भावनांत गुंतणे,  
शब्दांचे ते घाव घेणे मी प्रयत्ने टाळतो।i
रोजची नशिबी अवहेलना हेटाळणी,
वेदनेचा एक गाव मी हृदयी पाळतो।।

              ......प्रल्हाद दुधाळ.

Tuesday, March 17, 2015

होड्या

माणसाचे हे आयुष्य,
कागदाच्या होड्या जशा...
भरकटते जीवन, 
वारा ठरवितो दिशा.... 
.....प्रल्हाद दुधाळ.

Sunday, March 15, 2015

होड्या.

**************************
त्या पावसातल्या निरागस खोड्या,
पाण्यात सोडल्या रंगारंग होड्या.....
वास्तवात त्या कधीही  ना जुळल्या,
भातुकलीच्या खेळामधल्या जोड्या....
*****************प्रल्हाद दुधाळ.

Thursday, March 12, 2015

सये.

तोच मी, तोच तो नदीचा  किनारा,
दाटते  हुरहुर पुन्हा  ती सखे ....
गीत स्मरते ,भासते आसपास,
अन् पुन्हा त्या सांजवेळी तू सये.....
             .........प्रल्हाद दुधाळ.

Sunday, March 8, 2015

बहाणे.

फुलांत फुल हे रमले भासते ,
कवितेत त्याच्या हरवून जाते,
सत्य असे का लपवून लपते?
शृंगारुन त्याची ती वाट पहाते!
    .........  प्रल्हाद दुधाळ.

Thursday, March 5, 2015

होळी.

घडले जे काही गैरसमजातून
आज विसरून सगळे ते जावू !
सण होळीचा हा करू साजरा
चला रंगात सारे रंगून जावू !!
     ..............प्रल्हाद दुधाळ .

Tuesday, March 3, 2015

पाऊस

हवा जेंव्हा गायब 
नको तेंव्हा हजेरी 
असा अती लहरी 
पाऊस हा !
...प्रल्हाद दुधा

उत्साह

चाहूल लागता रविकिरणांची,

 नगरात असा उत्साह दाटला...

पोटापुरता पसा मिळविण्या,

 जीव येथला कामास लागला....


...........प्रल्हाद दुधाळ.