Friday, December 22, 2017

मन



मन
मन असं मोकाट
नको तिथे हिंडतं..!
शिकवाया गेलं की
बुध्दीसंगे भांडतं..!
..... प्रल्हाद दुधाळ.

Saturday, December 16, 2017

तुझ्यासवे

आधारासाठी काठी हातात
आलाय जरी पाठीला बाक..!
सखे साथीला तुझ्यासवे मी
धिराने चालू उरली वाट..!
    ..... प्रल्हाद दुधाळ.

Thursday, August 17, 2017

माणसे.

मनातले बोलावे जयांशी 
भेटती ना अशी माणसे..!
भावनांशी फुका खेळणारी 
खेटती कित्येक माणसे..!

संधी

समस्येतली संधी ....
समस्येतली संधी 
अचूक ती हेरावी 
द्याच्या घासासाठी 
आज भूकही मारावी
......प्रल्हाद दुधाळ 

Tuesday, August 8, 2017

बगळे.

भावनांच्या त्या बाजारात 
निर्दयी ग्राहक सगळे..!
दबा ते धरून बसती 
जसे संधिसाधू बगळे ..!
.... प्रल्हाद दुधाळ

Thursday, July 27, 2017

नाग

गारूड्याच्या तालावर डोलणारे
आता दिसत नाहीत तसे  नाग..!
विषाचेही  झाले आहे प्रदुषण
डंख झाला मनुष्यजन्माचा भाग..!
     .... प्रल्हाद दुधाळ.

Sunday, July 23, 2017

भाषा

गुंफू नयेच शब्दात
नजरेतल्या भाषेला...
लाऊ नयेच कुणाला
उगाच असे आशेला...
   ..... प्रल्हाद दुधाळ.

Wednesday, July 19, 2017

नाटकी ...

बोलतो गोड तोंडदेखले
वागणे अत्यंत हे नाटकी...!
खुलासे देऊ कोणाकोणाला
वक्तृत्वशैली माझी फाटकी...!
   .... प्रल्हाद दुधाळ

Tuesday, June 27, 2017

कल्पनां

लिहित असतो काहीबाही
मला शोधू नका त्या शब्दांत...
जिताजागता आहे समोर 
जोखत बसू नका कल्पनांत...
..... प्रल्हाद दुधाळ.

व्यर्थ ...

व्यर्थ ...
सौंदर्य बुध्दी शिक्षण करिअर 
पद प्रतिष्ठा पैसा सर्व बेकार ...!
जर जोडीला यांच्या दुराभिमान 
आणि नको एवढा तो अहंकार...!
.... प्रल्हाद दुधाळ .

आव्हान

आलोय मेटाकुटीला पेलताना 
इथल्या या जगण्यातले आव्हान...! 
कसे काय राखत बसावे भान 
घडोघडी सोडून आत्मसन्मान...?
प्रल्हाद दुधाळ.

घुटमळ

प्राजक्ताचा सडा अंगणात माझ्या 
सुगंध आसमंती दरवळतो...
माहीत आहे येता जाता कशाला 
माझ्या आसपास तू घुटमळतो...
..... प्रल्हाद दुधाळ .

Monday, May 29, 2017

कोंडी

चोहोंकडून होतेय कोंडी
जपून मना पाऊल टाक
दिवास्वप्ने होत नाही खरी
वेळीच त्यांना ठेचून टाक
.... प्रल्हाद दुधाळ

Friday, May 26, 2017

माणसे

अशी माणसे ही
कशी माणसे ही...
खुजी विचारांनी
नव्हे माणसे ही...
    .... प्रल्हाद दुधाळ.

Sunday, April 16, 2017

वाटते

वाटते ...
कधी कधी वाटते की
सोडून सगळे द्यावे,
मुक्त व्हावे पाशातून
वनी जावून बसावे !

कधी कधी वाटते की...
उगाच कशाला बोलू,
गुपीत चार चौघात
विनाकारण का खोलू?

कधी कधी वाटते की
काहीतरी चुकतय,
खऱ्या त्या सुखापासून
मन भरकटतय!

कधी कधी वाटते की
तोडून टाकाव्या बेड्या,
अंतर्मन  म्हणतय
गुलामीच मस्त वेड्या!

कधी कधी वाटते की
मनातलं ते मांडावं,
लाजलज्जा ती सोडून
 कचाकचाकी भांडावं!

कधी कधी वाटते की
 हक्काचं माणूस हवं,
पडतय स्वप्न आता
बसवाव गाव नवं?
   ... प्रल्हाद दुधाळ.

Thursday, March 30, 2017

झलक

झलक .
चढलेला पारा
घामाच्या या धारा
झलक एकच
थंडगार वारा
.... प्रल्हाद दुधाळ 

Tuesday, March 28, 2017

दुखडं

दुखडं.
आवडतात छोट्या समस्या
आम्हाला सदा मिरवायला..!
इवली इवलीशी ती दु:खे
पुन्हा तीच ती  गिरवायला..!
....... प्रल्हाद दुधाळ.

Friday, March 3, 2017

कशाला

.......कशाला .......... 
नियतीने दिलेले पत्ते 
स्वीकारून डाव खेळावा! 
डोकावून कधी कुठेही 
कशाला जीव हा जाळावा?
.....प्रल्हाद दुधाळ.

कधी कधी

सगळेच नमतात 
त्या उगवत्या सुर्याला..!
वंदन करावे कधी 
मावळतीच्या दर्याला..!
.... प्रल्हाद दुधाळ.

Wednesday, March 1, 2017

डाव

 .......डाव ..........
नियतीने दिलेले पत्ते
स्वीकारून डाव खेळावा!
डोकावून कधी कुठेही
कशाला जीव हा जाळावा?


खेळताना पत्त्याचा डाव 
राखावा हुकमाचा एक्का..! 
राणी असो किंवा गुलाम 
विजय आपलाच पक्का..!

Saturday, February 4, 2017

सूर्यदेव

उगवत्या सूर्यदेवा
नमस्कार माझा तुला..!
आस्तीत्वाने तुझ्या
अंधकार तो पळाला..!


ग्रह तारे एका जागी   
भासे त्याचे येणे जाणे..!
साऱ्या सृष्टीला पोसती
रवी शशीची किरणे..!

 ....प्रल्हाद दुधाळ.

Thursday, February 2, 2017

नाते

मंगल मुहूर्तावरी चालते
हाती हात घेवून सप्तपदी..!
सुसंवादाने आणि सौहार्दाने
पार करू डोंगर नाले नदी..!
     .... प्रल्हाद दुधाळ.

भारतीय संस्कृती आपली
मोलाचा आहे लग्नसंस्कार...!
तडजोडीने फुलवू नाते
होईल सुखाचा ग संसार ...!
       .... प्रल्हाद दुधाळ.

Wednesday, February 1, 2017

प्रगती

प्रगती 
डिजीटल त्यांच्या इंडियात
भारताची पाटी आहे कोरी..!
अजूनही आम्हा लागे खावी 

कचराकुंडीतली भाकरी..!

तिथे पलिकडे महाली
पक्वानेही ती जाती वाया ..!
इथे चिमुकल्या पोटाला 

लागे शिळेपाके चावाया..!
..... प्रल्हाद दुधाळ.

Tuesday, January 31, 2017

भास..

भास..
प्राजक्ताच्या पायघड्या 
सुंगंधाची दरवळ...! 
अवचित होतो भास 
आहे इथे तू जवळ...! 
.... प्रल्हाद दुधाळ.

प्राजक्त ...

प्राजक्त ...
पहाटवारा गंधीत झाला
किनकिनतो तुझा ग चुडा...
पदरव त्याचा टपटप

दारावर प्राजक्ताचा सडा ...
**** प्रल्हाद दुधाळ.

Friday, January 6, 2017

धाक

धाक.
असते बोलायाचे खूप 
शब्द नाहीच येत ओठी... 
धाक घालतात संस्कार 
कधी अहंकाराच्या गाठी...
...... प्रल्हाद दुधाळ.

Thursday, January 5, 2017

नाही.

नाही.
लिहिल्या तोडक्या ओळी काही 
त्यांना 'गजल' म्हणालो नाही!
वागावे बरे कोणी म्हणोनी 
कोणा 'बदल' म्हणालो नाही!
...... प्रल्हाद दुधाळ