Monday, June 16, 2014

साभार.



जे दिले नियतीने
साभार घेतले मी
उज्वल उद्या साठी
साकडे घातले मी.
........ प्रल्हाद दुधाळ.

श्रीमंती.

धन दौलत बंगला गाडी 
व्यर्थ जर नाही तेथे नीती,
माणुसकी धर्म हवा अन 
दिलदार मनाची श्रीमंती.
....प्रल्हाद दुधाळ.

जाणीव.

जाग्रूत जाणीवेने 
धरेवरी पाय होता 
अन्यथा जीवना या 
आधार काय होता ?
.....प्रल्हाद दुधाळ

Tuesday, June 10, 2014

माफी.

माफी मागून,माफ करून,
नाही बदलत भूतकाळ,
एवढ मात्र नक्कीच होत,
प्रसन्न होतो भविष्यकाळ!

      ......... प्रल्हाद दुधाळ  

पाप.

धुंडाळले आश्रम सारे
केले किती जपताप
केली किती तीर्थाटने
धुतले जाईना ते पाप.
      .......प्रल्हाद दुधाळ. 

हेतू.

आयुष्यभर  केलेस,
हेवेदावे आणि मी तू,
मनास विचार एकदा,
काय जगण्याचा हेतू?
            .....प्रल्हाद दुधाळ  

Saturday, June 7, 2014

अधांतरी

काडी काडी जमऊन
माझे घरटे  बांधले
आयुष्याचे संचित
अधांतरी हे टांगले.
            प्रल्हाद दुधाळ.

Monday, June 2, 2014

खजिना

तुझी साथ मिळाली
आधारास हात मिळाला
आयुष्यात आनंदाचा
खजिना हातोहात मिळाला.
      ........प्रल्हाद दुधाळ 

तगमग

वाटेत जे भेटले जीवनी  
सगळेच कुठे  माझे होते?
वाटसरूंना जिवलग काही
आठवताच तगमग होते!
            प्रल्हाद दुधाळ.

आठवणी

क्षण वेचले तुझ्यासवे,
होते का ग ते स्वप्न?
चाळविती आठवणी,
ठिकाणी ठिकाणी !
            प्रल्हाद दुधाळ .

चंद्रकोर.

पुन्हा पुन्हा खुणावत होता,
कोजागिरीचा तो चंद्र  तिला ,
चिंता होती सतावत त्याला,
सांजेच्या एका चतकोरीची!
                    प्रल्हाद दुधाळ .

दिशा

 विचारांची दिशा
 बदल रे  थोडी
 वाढेल निश्चित
आयुष्याची गोडी!
            प्रल्हाद दुधाळ.

कुचकामी

सख्यास्तव उसंत  नाही
कर्तव्य असे कुचकामी
एकटी वाट जीवनाची
आयुष्य असे कुचकामी!
   ........प्रल्हाद दुधाळ.