Wednesday, June 29, 2022

नाते

 

पाऊस_चारोळी 
धो धो पाऊस आणि माझे
कुणास ठाऊक काय नाते
कोसळतो आडवा तिडवा
मनाची या घालमेल होते
©प्रल्हाद दुधाळ.

Tuesday, July 28, 2020

कशाला

कशाला?
सोडायचं नव्हतंच तर
 जायचंच कशाला
 ताकाला जाऊन भांड
 लपवायचं कशाला

 एकदा सोडलंच तर
 आठवायचं कशाला
  पुन्हा मान फिरवून
  माग बघायचं कशाला

    © प्रल्हाद दुधाळ 

Saturday, May 2, 2020

अंतरंग

अंतरंग

अंतरंगातले ते  रंग
काही गर्द काही फिके
काही बोलती घडाघडा
काही अबोल जणू मुके

जशी व्यक्ती तशी वृत्ती
कुणी आतल्या आत दंग
सुखी जीवनाचे आहे मर्म
असावे पारदर्शी अंतरंग
©प्रल्हाद दुधाळ

Wednesday, April 29, 2020

जपून...

जपून...
सांभाळूनच जरा मुली
नाजूक तुझी ग पावलं
थिरकू दे तालसुरात
दाखव कौशल्य आपलं
   ©प्रल्हाद दुधाळ

Thursday, November 14, 2019

पहाट

पहाट...
 आजच्या पहाटेचा
 आहे अंदाज न्यारा
 आठवण तुझी अन
 बोचरा थंड वारा
    ... प्रल्हाद दुधाळ.

Monday, July 29, 2019

घन ओथंबून आले

घन ओथंबून आले
चिंतातूर मन झाले
कुठे घ्यावा रे आसरा
नयनात पाणी आले

घन ओथंबून आले
आता येईल ती सर
अशा रम्य या सांजेला
प्रेम भावनेला बहर

घन ओथंबून आले
येईल तो मृदगंध
अशी झाले उतावीळ
घेण्या भरून सुगंध

घन ओथंबून आले
विचाराने मन चिंब
गोंधळले किती सांगू
ओशाळले प्रतिबिंब

घन ओथंबून आले
मनी दाटे हूरहूर
असशील कुठे आता
मी इथे तू तिथे दूर
....प्रल्हाद दुधाळ.